मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काल सोमवारी जाहीर करण्यात आला. यानंतर राजकीय पक्षांमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असून आमचा पक्ष एक नंबर आहे. यावरून तु-तू, मे-मे झालं., यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत रत्नागिरीमधील ग्रामपंचायत निकालावरून तेथील आमदार, खासदार आणि पालक मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
रत्नागिरीच्या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी हे वाचा आणि खोटं बोलणं बंद करा… पराभव मान्य करा नाही तर लोकंच तुडवतील एक दिवस., असं निलेश राणेंनी ट्विट करत टीका केली आहे.
या निवडणुकीत भाजपने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. विशेषत: दक्षिण भागातील संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांमध्ये भाजपच्या संख्याबळात वाढ झाली, असंही निलेश राणे म्हणाले.
रत्नागिरीच्या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी हे वाचा आणि खोटं बोलणं बंद करा… पराभव मान्य करा नाही तर लोकंच तुडवतील एक दिवस. pic.twitter.com/kOQHoa4PuJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 21, 2021
महत्वाच्या घडामोडी-
…त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे- जयंत पाटील
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
“धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”
ऐतिहासिक! जो बायडन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष