पंतप्रधान मोदींमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?- जयंत पाटील

0
230

पुणे : महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?, असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, राज्याचं अधिवेशन घेण्याची यांच्यात हिम्मत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. यावर चर्चा होऊ शकते., असा उपरोधक टोमणाही जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने…; दारुबंदीवरून चित्रा वाघ कडाडल्या

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकरांची टीका

अबब..! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती घरी परतली; कुटुंबियांची झोपच उडाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here