Home महाराष्ट्र ‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपने बेळगाव महापालिका ताब्यात घेतली. या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

105 हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हरल्यामुळे, लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा; पण मराठी माणूस म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्दैव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी कोणती खेळी खेळली यासंदर्भात माहिती लवकरच समोर येईल. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरेंची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तरूंगात जाईल,आव्हाड तुम्हीही बॅग तयार ठेवा; किरीट सोमय्यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या बुडीत शेती कर्जमाफीचा निर्णय करा, केवळ ट्विट नको- राजू शेट्टी

‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

“आज बेळगाव महापालिकेवर ‘भगवा’ फडकला, उद्या तोच ‘भगवा’ मुंबई महापालिकेवर फडकणारच”