Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची बातमी; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची बातमी; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. आज HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हे ही वाचा : भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; नवाब मलिकांच्या आरोपामुळं खळबळ

मुख्यमंत्र्यांना मागील अनेक दिवसांपासून मानदुखी व पाठदुखीचा त्रास जाणवत होता. याच कारणामुळे ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळत होते. किंवा अनेक कार्यक्रमांना ते ऑनलाईन उपस्थिती दर्शवत होते.

शेवटी मानदुखीचा त्रास अधिकच वाढल्यानंंतर अखेर त्यांना शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागला आहे. आज सकाळी साडेसात वाजता ही शस्त्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात वाजता सुरु झालेली ही शस्त्रक्रिया एक तास चालू होती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्याना आठवडाभर विश्रांती घ्यायला सांंगितली आहे. एका आठवड्यानंतर मुख्यमंत्र्याची फिजीओथेरपी सुरू करणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्याची तब्येत आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली विझवणाऱ्या या सरकारला आता कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीये”

उद्धव ठाकरे हाॅस्पिटलमधून काम करताहेत, केअर टेकर मुख्यमंत्र्यांची गरज नाही- संजय राऊत

भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत