“मुलाच नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

0
3063

मुंबई :  जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे.

कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उदयनराजेंवर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसं शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, होय शरद पवार हेच जाणता राजा. महाराष्ट्रात सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे, म्हणून अनेकजण त्यांचं बोट हातात घेऊन राजकारण करतो, असंही आव्हाड म्हणाले.

 महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना पक्षला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना; ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

“सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद का होती?”

शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांच्या वरचे स्थान आहे का? निलेश राणेंचा राऊतांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here