आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये नियुक्त्या आणि पदभरतीवरून सुरू असलेला घोळ अद्यापही संपलेला नाही. त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. आज माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर बोलत होते.
ठाकरे सरकारच्या निष्क्रीय कारभारामुळे स्वप्नील लोणकरला आत्महत्या करावी लागली होती. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या. प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही समन्वय दिसून येत नाही. हे काय फक्त टक्केवारीसाठी एकमेकांसोबत फुगड्या खेळतायेता का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
दरम्यान, आतातर यांनी वेगवेगळ्या 20 विभागातील 11,351 पदे रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त 4,264 रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी केली. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील 2,500 च्या आसपास पदे रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवी आयोगाला कुठलीच मागणी केली नाही. हा घोळ अनके खात्यांमध्ये आहे. स्वत:ची मुलं, नातू, आमदार, खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
उडता कोहली! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता कोहलीचा भन्नाट झेल; पहा व्हिडिओ
“महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधी पक्ष आपली पोळी भाजत आहेत”
नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील लोकप्रिय नेते; सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमने