Home महाराष्ट्र मनापासून माफी मागतो; आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राजेश टोपेंनी मागितली...

मनापासून माफी मागतो; आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राजेश टोपेंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीच्या अनेक चुका समोर आल्या होत्या. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली.

आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. तसेच परीक्षेची जबाबदारी ‘न्यासा’ची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्या, असंही टोपे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधी पक्ष आपली पोळी भाजत आहेत”

नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील लोकप्रिय नेते; सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमने

“चंद्रकांतदादांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे 105 आमदार निवडून आले; हे शिवसेनेने विसरू नये”

“हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी ‘या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”