आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायगड : आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा सवाल जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा : शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच, पण इतरांवरही कडक कारवाई करावी, असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांचं विधान
मोठी बातमी! कोल्हापूरात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशांची पाकिटं
गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी