आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. या हल्यात जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी, फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृह मंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “ठाकरेंना मोठा धक्का; ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या’ महिलेवरच…”
माझ्या संयमाचा अंत बघू नका. मी जर तोंड उघडले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल., असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी ठाकरेंना दिला. ते माध्यमांशी बोलत होते.
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली नाही, त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत बसला होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. मी संयमानेच वागतोय. मला तुमच्यापेक्षांनी चांगले शब्द वापरता येते, कारण मी नागपूरचा आहे. मात्र ते फ्रस्ट्रेशनमध्ये असल्याने मी तसे वागणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी
मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….
मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय