आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी एकहाती सत्ता काबीज करत सतेज पाटलांना मोठा धक्का दिला आहे.
कोल्हापूरात कसबा बावड्याच्या निमित्ताने दोन्ही गटातील वाद चांगलाच वाढला होता. दोन्ही गटाच्या बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. संपूर्ण कोल्हापुरातील राजकारण या निमित्ताने ढवळून निघालं होतं. मात्र अखेर या निवडणुकीचा निकाल हा महाडिक गटाच्या बाजूने लागल्याचं पहायला मिळालं.
ही बातमी पण वाचा : अगरवाल-क्लासेनची शानदार खेळी व्यर्थ; निर्णायक सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय
दरम्यान, सतेज पाटलांनी पुन्हा नादाला लागू नये, असा इशाराच या निवडणुकीच्या निमित्ताने महादेवराव महाडिक यांनी दिला. तर सतेज पाटलांनीही महाडिकांना प्रत्युत्तर दिलं. वाढीव सभासदांमुळे आपला पराभव झाल्याचं म्हणत सतेज पाटलांनी महाडिकांवर खापर फोडलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”
उध्दव ठाकरेंना बालेकिल्ल्याल्यातच मोठा धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले…