Home महाराष्ट्र “आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”

“आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत संभ्रम नसल्याच्या चर्चा समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असं वक्तव्य पवारांनी यावेळी केलं.

ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरेंना बालेकिल्ल्याल्यातच मोठा धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, शरद पवारांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले…

अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा वसईत राडा

“ज्यांनी भगव्याला कलंक लावले, त्यांचे हात…; जळगावातून उद्धव ठाकरेंचा घणाघात