मुंबई : राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली.
लसीच्या तुटवड्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे, असं सांगितलं आहे.
केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे- नाना पटोले
“ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झालीये”
“अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? “
एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका