माजी गृहमंत्री काय हनीमूनला गेले काय?; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

0
659

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा उपरोधक सवाल अमृता फडणवीस यांनी केला. यावर अमृता फडणवीस यांनी, ‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

हे ही वाचा : ‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

दरम्यान, अमृता फडणवीसांनी यावेळी ड्रग्स प्रकरणावरही भाष्य केलं. इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते, असं अमृता फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचे हिंदुत्व आणि मनसेचे हिंदुत्व यात जमीन-आसमानचा फरक”

अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

“जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले याचं उत्तर द्यावं”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here