Home क्रीडा धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना

धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने निवृत्तीसाठी साधलेला दिवसावरुन सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. परंतू धोनीने आपली निवृत्ती ही अचानक जाहीर केली नसून याबद्दल त्याने BCCI ला कल्पना दिली होती.

धोनीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला पत्र लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार असल्याचं सांगितलं. कोणत्याही भारतीय खेळाडूला निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्याआधी बीसीसीआयला त्याची कल्पना द्यावी लागते. धोनीनेही याचप्रमाणे बीसीसीआयला पत्र लिहून आपण निवृत्त होणार असल्याचं कळवलं होतं.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असतो तरीही पुढची काही वर्ष आयपीएल खेळत राहणार असल्याचंही धोनीने यावेळी नमूद केलं. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे; भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

जगाने तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला; धोनीच्या निवृत्तीवर कोहलीचं भावूक ट्विट

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडूलकरचं ट्विट; म्हणाला…

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती