“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”

0
1773

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र तरूणीवर 2 नेत्यांनी केलेल्या ब्लॅकमेलच्या आरोपाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी तूर्तास राजीनामा घेण्यास नकार दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी मुंडे प्रकरणात मांडलेली भूमिका कायम आहे. त्यामुळे आंदोलन कुणासाठी करायचे? शेतकरी आंदोलकांसारखे आम्हाला तिष्ठत ठेवतील. धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संबंधित महिलेच्या चारित्र्यावर शंका घेतली जात आहे. याप्रकारची शंका घेणारे वैदिक विचारांचे असतात आणि त्यांच्या बाजूने वंचित कधीच नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोकं मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी शरद पवार देत असतील तर…- प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here