बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर रेणू शर्माने बलात्काराची केस मागे घेतली. यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले, लाज वाटली पाहिजे; भाई जगताप कडाडले
“आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा”
शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण
“BREAKING NEWS! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद”