बीड : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. धनंजय मुंडेंच्या ‘फैसला ऑन दि स्पॉट’ कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं.
धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहण पार पाडल्यावर धनंजय मुंडे हे बीडच्या विश्रामगृहात थांबले होते. नेहमीप्रमाणे मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतले. कामात हयगय नको, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
महत्वाच्या घडामोडी-
“प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास”
राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सर्वांसाठी लोकल लवकरच सुरू करणार- उद्धव ठाकरे
हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल