आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा : “रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, म्हणाल्या, तुमच्यात जर हिंमत असेल तर…”
गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळं असतं. गेल्या पाच सात वर्षात जे तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळालं ते मिळालं नसतं, असं सांगतानाच धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत. राजकारणात त्यांचा वारसा म्हणून गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना पुढे आणलं, असं वक्तव्य देखील एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
धनंजय मुंडेंनी साऱ्या समाजांना बरोबर घेऊन काम करत हा वारसा सिद्ध केला. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंप्रमाणे महाराष्ट्राचे, सर्व समाजांचे नेतृत्व करावे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”
पुन्हा पक्ष सोडणारच्या चर्चांवर वसंत मोरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…