पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्याकडून वारंवार राजीनाम्याटी मागणी करत असताना धनंजय मुंडे हे राष्ट्रावादी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यांना दिलं आहे., असं मुंडे म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल.
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही- प्रकाश आंबेडकर
माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे
धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडली आहे, मात्र…- शरद पवार
कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील