आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “…हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे”; राष्ट्रवादीची टीका
निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्यात एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्याकडे आहेत, तीच खरी शिवसेना ठरणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. आमदार-खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय होतो. मतदारांची संख्या पाहूनच निर्णय होत असतो. अजून पूर्ण निकाल मी वाचलेला नाही, पण, यापूर्वीच्या निवडणूक आयुक्तांनी सुद्धा अशा प्रकरणांमध्ये अशाच आशयाचे निर्णय दिलेले आहेत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…