मुंबई : कोरोना रुग्णांना घरी सोडणाऱ्यांचा एकाच दिवशी वाढलेला आकडा आणि वाढत जाणारी मृत्यूंची संख्या याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं.
वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमधल्या हवालदारांना 10 दिवसानंतर सोडून देण्यात आलं. घरी सोडल्यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी त्यांना 2 तास संघर्ष करावा लागला, पण रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, एकीकडे रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, असं राज्य सरकार सांगत आहे. मात्र गेल्या 4 दिवसांत 100 लोक मृत्यूमुखी पावलेले आहेत, कोरोनाग्रस्तांना घरी सोडताना त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी न घेता, त्यांना घरी सोडलं जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
घरी जाण्याची परवानगी देणार्यांच्या रूग्णसंख्येत एकाच दिवशी 8381 इतकी वाढ आणि सातत्याने वाढत जाणारी मृत्यूसंख्या. आकडेवारीपेक्षा कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे अधिक लक्ष देण्याची गरज. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पाठविलेले पत्र…@CMOMaharashtra pic.twitter.com/zJAdbBeVAi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2020
महत्वाच्या घडामोडी –
रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढतंय- देवेंद्र फडणवीस
मुंबई पोलिसांसाठी सलमान खानने केली ‘ही’ मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
…तर मी आत्महत्या करेन; रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी