Home महाराष्ट्र …तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेकजण अडचणीत येतील; शिवेसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं...

…तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेकजण अडचणीत येतील; शिवेसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं आहे. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे  याप्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सभागृह दणाणून सोडले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणाचा दाखला देत भाजपवर पलटवार केला.

महत्वाच्या घडामोडी –

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”

“नाशिकमध्ये उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद”

मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला ‘हा’ अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय वायरल; पहा व्हिडीओ

अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार