मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. आणि कोरोनाला थोपवण्याच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला समर्थन दिलं आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले त्याला आमचं समर्थन आहे. मात्र राज्याने अजून निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्य सरकार जे काम करतंय त्याला समर्थन आहे. मात्र अजून खूप काम करणं आवश्यक आहे. अनेक आव्हाने आहेत, ती सोडवण्यासाठी राज्याला प्रयत्न करावे लागतील. आम्ही टीका करणार नाही, सूचना देऊ, असं फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, सुरक्षित अंतर हाच कोरोना रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे. घराबाहेर पडू नका, समाजाला मदत करा, असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवारांच स्पष्टीकरण; म्हणतात…
महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला संताप व्यक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणार
लॉकडाऊनच्या काळात चंद्राकांत पाटलांचा नवा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी