Home महाराष्ट्र शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांना सुनावलं ; म्हणाले…

शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांना सुनावलं ; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. यावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांच्या सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

“एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

दरम्यान, शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते दृश्य अतिशय भयावह होतं. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते कोल्हापुरात बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली

 भोंग्यावरून राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुजात आंबेडकरांना मनसेचं जोरदार उत्तर, म्हणाले…