आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी निवासस्थानी ‘शिवतीर्था’वर पोहोचले. फडणवीस यांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं. राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजपा युतीच्या चर्चा सुरू झाल्या. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट कौटुंबिक आहे. आतमध्ये काय चर्चा झाली मला कल्पना नाही. आजची भेट केवळ त्यांना घरी जेवायला बोलावण्यासाठी होती. आशिष शेलार, प्रसाद लाड हे राज ठाकरेंचे मित्र आहेत आणि ते सुद्धा येऊन गेले. त्यामुळे या भेटीचा दुसरा अर्थ काढण्याची काही गरज नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश, ठाकरे सरकारकडून मोठी पगारवाढ, मात्र एसटी कर्मचारी उद्या भूमिका जाहीर करणार”
निवडणुका घ्यायच्या की नाही, हे सरकार ठरवतात. सध्या निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. निवडणुका घेतल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही. त्यामुळे या निवडणुसाठी मनसेची तयारी सुरू आहे. मुंबई महापालिका मनसे जिंकेल, असा विश्वासही देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अशातच देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ विश्वासू नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
“मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता”
नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा आरोप