आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाहणी करायला गेले आहेत. नुकतच ते नांदेड दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनानं दुचाकीस्वारास उडवल्याची घटना समोर येत आहे.
फडणवीसांच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना छत्रपती अकॅडमी जवळ या गाडीनं दुचाकीस्वारांना धडक मारली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान, नांदेड येथील गडगा ते मुखेड मार्गावर ही घटना घडली असल्याचं समोर येत आहे. तसेच सुदैवानं या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंचा आदेश; मनसेची पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘ही’ मोठी मदत
“शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं”
भाजपाच्या ‘या’ महिला आमदारांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी
शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांच्या आठवणीने साबणे यांना अश्रू अनावर; म्हणाले…