मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा 6 मे रोजी स्मृतिदिन होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं होतं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही- नारायण राणे
17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल
…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील