आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अजित पवार गटाच्या नेत्यांकडून, रोहित पवार यांना नेता बनायचं आहे, अशी टीका केली जात आहे. या टीकेला आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित दादा मोठे नेते आहेत, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही, विचार जपण्यासाठी आलोय, काही नेत्यांना तर वाटत असेल की, मला नेता बनायचं, पण मला नेता बनण्याची घाई नाही, असा टोलाही रोेहित पवारांनी यावेळी लगावला. कल्याण येथील स्प्रींग टाईम हॉलमध्ये इंडिया आघाडीच्या सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यास…; आमदार अपात्रेबाबत बच्चू कडूंचं मोठं विधान
भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठिक नसल्याचे दाखवित आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करुन देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशी टीकाही रोहित पवार यावेळी भाजपवर केली .
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, आता रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…