आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकजूट होत महाविकास आघाडीची स्थापना केली. यानंतर राज्यातील भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर टीका करातना दिसतात. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष वाढत चालला आहे.
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या कार्यकाळावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने राज्य सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र केंद्राकडून अद्यापही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. सीताराम कुंटे यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपला पदभार देबाशिष चक्रवर्ती यांना सोपवावा लागला आहे.
हे ही वाचा : पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला
सीताराम कुंटे यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा राजीनामा दिला असला तरी राज्य सरकारकडून त्यांची नियुक्ती महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. कुंटे हे मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. राज्य सरकारला संकटकाळात व्यवस्थितपणे हाताळण्याचे काम कुंटे यांनी केले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का?; यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल
“आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो”
वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक; महापालिका आयुक्तांना लिहिलं पत्र; म्हणाले…