मुंबई : सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीकडून अभय देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी गृहमंत्री बदलला जाणार नाही आणि राज्यात खातेपालट होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
एपीआय सचिन वाझेंच निलंबिन म्हणजे…; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार
“मोठी बातमी! सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली, उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलवलं”