मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतंच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाॅट्सअपवर स्टेटस ठेवून याबाबतची माहिती दिली आहे. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि डॉक्टरांचे आभार असे लिहिले आहे.
राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे., असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, असं म्हणत अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
…पण हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे; मंदिरं खुली करण्यावरून प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका
“लोणावळामध्ये ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवडमधील युवकाचा मृत्यू”
‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन
सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना टोला