उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

0
2628

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ऱाज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय.

अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद देखील घेतला. मात्र राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली, त्यामुळे…; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

महापालिका निवडणुकींमध्ये मनसे भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता स्वत: अजित पवार यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांची भेट घेतली.

दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांला उधान आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

निलंबित केल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; म्हणाल्या…

भाजपाचा शिवसेनेला दणका; भाजपात प्रवेश करणाऱ्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here