पंढरपूर : मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
सर्व घटकांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. या सरकारचे 100 अपराध भरले आहेत. 100 अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका,” असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस
वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा
“पंढरपूरमध्ये फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी; भाजपलाही पावसाच्या चमत्काराची आस”