दुबई : आजच्या सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 44 धावांनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 175 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक 64 धावा केल्या. तसेच शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी अनुक्रमे 35 आणि 37 धावांची खेळी केली. चेन्नईकडून पियूष चावलाने 2 तर सॅम करणने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली नाही झाली. सलामीला आलेल्या शेन वाॅट्सन व मुरली विजय यांनी 23 धावांची सलामी दिली. वाॅट्सनने 14 धावा केल्या. तर मुरली विजयने 10 धावा केल्या. नंतर आलेला रुतुराज गायकवाडही फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ 5 धावांवर बाद झाला. चेन्नईने आपल्या 3 विकेट्स केवळ 44 धावांत गमावल्या. त्यानंतर फाफ ड्यू प्लेसिस आणि केदार जाधव यांनी डाव सावरण्याचा प्रचत्न केला. दोघांनी 54 धावांची भागीदारी केली. मात्र फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात केदार जाधव आऊट झाला. केदारने 21 चेंडूत 26 धावा केल्या. कर्णधार धोनी मैदानात आला. नंतर फाफही आऊट झाला. फाफने 35 चेंडूत 43 धावा केल्या. पण धोनी अजूनही मैदानात होता. शेवटच्या षटकात धोनी आऊट झाला. धोनीने 12 चेंडूत 15 धावा केल्या. चेन्नई 20 षटकात 7 बाद 131 धावा करू शकली.
दरम्यान, दिल्लीकडून नाॅर्तझेने 2, कगिसो रबाडाने 3 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं; नितेश राणेंचं सूचक वक्तव्य
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार; सरकार मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र