आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लखनाै : आयपीएलचा 16व्या हंगामाला काल सूरूवात झाली असून आज आयपीएलचा तिसरा सामना लखनाै सुपर जायंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनाैने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनाैने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावत 193 धावा केल्या. लखनाैकडून सलामीवीर कायले मियर्सने 38 चेंडूत 73 धावांची विस्फोटक खेळी केली. मियर्सने आपल्या खेळीत 2 चाैकार व 7 षटकार ठोकले. तर निकोलस पूरनने 21 चेंडूत 36, तर आयुष बडोनीने 7 चेंडूत 18 धावांची वेगवान खेळी केली. तर खलील अहमद, चेतन साकरियाने 2, तर अक्षर पटेल व कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकात 9 विकेट गमावत 143 धावाच करू शकला. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने सर्वाधिक 48 चेंडूत 56 धावा केल्या. राईली रूसोने 20 चेंडूत 30 धावा केल्या. तर दिल्लीच्या बाकी फलंदाजांनी निराशा केली. लखनाैकडून मार्क वूडने घातक गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 14 धावा देत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर आवेश खान, रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
संभाजीनगर आणि मालवणी दंगलप्रकरणावर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…
“शिंदेंकडे गेलेले अनेक आमदार, उद्धव ठाकरेंकडे लवकरच परत येणार”