Home नांदेड देगलूर विधानसभा निवडणूक! भाजपने शिवसेना नेता फोडून उमेेदवारी दिली, आता काँग्रेसकडूनही तोडीस...

देगलूर विधानसभा निवडणूक! भाजपने शिवसेना नेता फोडून उमेेदवारी दिली, आता काँग्रेसकडूनही तोडीस तोड उमेदवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेेचे नाराज झालेले माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडूनही आता नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, नांदेडमध्ये या पोट निवडणुकीच्या निमिताने साबण विरूद्ध जितेश अशी लढत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडा, पण मतदान भाजपलाच करा- सदाभाऊ खोत

मोठी बातमी! MPSC कडून 2021 ची जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या माहिती

पुण्यात भाजप-मनसेची युती झाल्यास ‘या’ दोन नेत्यांचे मनोमिलन होणार?

शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत या सरकारला जगू देणार नाही- देवेंद्र फडणवीस