आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. या पोटनिवडणुकीसाठी 64 टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं आहे. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून आता मतदारांचा कौल कुणाला याचीच चर्चा आता रंगली आहे.
हे ही वाचा : ‘2024’च्या निवडणुकीमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं; निलेश राणेंनी फुंकलं रणशिंग
देगलूरच्या या पोटनिवडणुकीवर बोलताना विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमचे मागचे 5 वर्ष चांगले की महाविकास आघाडीचे दोन वर्षे चांगली याचं मूल्यमापन करणारी ही निवडणूक आहे, असं सांगितले होते. तर मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला राज्यातील सत्ता पाडायची आहे, त्याचं ट्रायल ते देगलूरमधून घेतायत, असं म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या विधानावरून या पक्षांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली होती याची कल्पना येते.
दरम्यान, 2019च्या विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघात 61 टक्के मतदान झाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
देगलूर-बिलोलीमध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच जिंकेल- बाळासाहेब थोरात
नवाब मलिक सारख्या लोकांना मी माझ्या खिशात ठेवतो; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचे संवेदनाहीन; प्रविण दरेकरांची टीका