बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव- देवेंद्र फडणवीस

0
295

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपने बेळगाव महापालिका ताब्यात घेतली. या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

105 हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हरल्यामुळे, लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा; पण मराठी माणूस म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, असं जोरदार प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.

मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील आरोग्य केंद्रे बंद करून मंदीरे उघडू का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

“बेळगाव पालिकेवर भगवा फडकलाय?; मग बेळगाव, महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा”

…तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही; चित्रा वाघ यांचा पलटवार

“रुपालीताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here