मुबंई : महाराष्ट्र आणि मुंबई यातील आकड्यात काहीशी घट झाली आहे पण इतक्यात भ्रमात राहायचं नाही, आकडे वरखाली होत राहतात. मी तपास करण्यास सांगितला आहे. मात्र आतापर्यंत जसं तुम्ही सहकार्य केसं तसं इथूनपुढेही करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले, काल संध्याकाळपर्यंत 66 हजार 796 टेस्ट केल्या, किमान 95 टक्के निगेटिव्ह, 3600 जणांना लागण, 350 जण बरे, 70 ते 75 टक्के अतिसौम्य किंवा लक्षण नसलेले कोरोनाबाधित आहेत. ही आकडेवारी काल रात्रीपर्यंतची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले, काल संध्याकाळपर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट केल्या, किमान ९५ टक्के निगेटिव्ह, ३६०० जणांना लागण, ३५० जण बरे, ७० ते ७५ टक्के अतिसौम्य किंवा लक्षण नसलेले !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) April 19, 2020
दरम्यान, जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण दिसत असले तर ती लपवू नका. फिव्हर क्लिनीकमध्ये जा. जर लक्षण दिसतं असतील तर लोकं वाळीत टाकतील का? असा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही, असही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत
तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल
टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी
“उद्धव ठाकरेंविरुद्ध गुन्हा केव्हा दाखल होणार?; किरीट सोमय्यांचा सवाल”