Home महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधानांना...

लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी कसं जगायचं? रुपाली चाकणकरांचा पंतप्रधानांना सवाल

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा पंतप्रधान यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण हातावर पोट असलेल्या गरिबांनी कसं जगायचं?, असा सवाल राष्ट्रवादीच्या  प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा पंतप्रधान यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण यात शेतकरी, हातावर पोट असलेले, कामगार, यांच्या विषयी अधिक स्पष्टता येणे गरजेचे होतं. कारण या सर्वांच्या जगण्याचा विचार करावा लागेल, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

दरम्यान, गरीबांना तसंच मध्यमवर्गियांना, शेतकरी आणि कामगारांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

“आपल्या घरासमोर आपणच लक्ष्मण रेखा ओढू आणि ती पार न करण्याची शपत घेऊ”

“लॉकडाऊनला सकारात्मक पाठिंबा देऊन आपण कोरोनावर मात करूया”

भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन; पंतप्रधानांची मोठी घोषणा