मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास आमचा केंव्हाही आणि कधीही विरोध नाही. पण शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचं याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल भाजप प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठक पार पडली. त्यात फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं.
ग्रामपंचायच निवडणुका पार पडल्यावर वीजबिल थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचा महावितरणाचा निर्णय हा सरकारच्या विश्वासघाताचा नमुना आहे, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, बिल्डरांच्या शुल्कसवलतीसाठी राज्य सरकारकडे निधी आहे पण सर्वसामान्यांच्या वीजबिल सवलतीसाठी नाही, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महाविकास आघाडीवर जनतेचा ठामपणे विश्वास आहे- आदित्य ठाकरे
…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा
पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…- अतुल भातखळकर
“शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार”