मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना प्रतिक्रिया देताना अश्रु अनावर झाले.
“खरं तर मी आता निःशब्द झाले. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी तिला बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीने हे अत्याचार चालले ते कुठे तरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका.” तसेच, राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
दरम्यान, अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रॉसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रॉसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, अशी मागणी वाघ यांनी केली.
“साकीनाका पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई, आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर… लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना… नाही वाचवू शकलो तुला…”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं.
साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली
माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही
पण
या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर
लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना
नाही वाचवू शकलो तुला— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“गुजरातच्या राजकीय वर्तकुात भूकंप, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा”
साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
“साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू”