माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
196

यवतमाळ : पूजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड यांची जागा आता मला द्या, अशी मागणी संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवक रवी तरटे यांनी केली आहे. त्यासाठी रवी तरटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

गेल्या 5 वर्षांपासून शिवसेना निष्ठावंत म्हणून काम केलं आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे त्यामुळे मला वनमंत्री करा, अशी मागणी रवी तरटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच रवी तरटे यांनी तहसीलदारांमार्फत पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

दरम्यान, इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी अशी माझी मागणी आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रिपद द्यावं, अशी मागणी रवी तरट यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचं निधन”

“बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”

वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंच पदार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here