गोप्याला आवर घाला, नाहीतर…; अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरी संतापले

0
237

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशा शब्दांत पडळकरांनी हल्लाबोल केला. या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गोपीचंद पडळकर अजित दादांबद्दल लायकीच्या बाहेर जाऊन बोलले असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सन्मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल.”, अशी प्रतिक्रिया मिटकरींनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, आता रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

 “सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here