आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदें गटाचे खासदार गजनान कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही.
गजानन कीर्तिकरांनी शनिवारी प्रेसनोट प्रसिद्ध करून त्यात रामदास कदमांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. याला रामदास कदमांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
गजानन कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी टीका रामदास कदमांनी यावेळी केली.
ही बातमी पण वाचा : दिपावली सणाचे औचित्य साधून गोपाळकृष्ण शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे पक्षासाठी भूषावह नाही. कीर्तिकरांचं वय 80 ते 85 वर्षे झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कीर्तिकरांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण, कुठलाच वरिष्ठ नेता प्रेसनोट काढत नसतो., असा टोला रामदास कदमांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
अजित पवारांसोबत झालेली भेट ही…; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार आले एकत्र; पुण्यात झाली भेट