मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या केईएम रूग्णालयात कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आजपासून सुरू करण्यात येणार आहे.
कोव्हिशिल्ड लशीच्या या चाचणीला केईएम रूग्णालयाच्या एथिक कमिटीने काही दिवसांपूर्वीच मान्यता दिली होती. त्यानुसार या चाचणीला आजपासून सुरुवात होत असून रूग्णालयातील 3 जणांना ही लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, आरटीपीसीआर आणि अॅन्टीबॉडीज चाचणी निगेटिव्ह असलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. तसेच ही लस टोचल्यानंतर या 3 व्यक्तींवर याचा काही परिणाम होतोय का हे पाहण्यात येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय”
ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं; नितेश राणेंचं सूचक वक्तव्य
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार; सरकार मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे