मुंबई : राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडट्टीवार यांनी दिली तर काही वेळातच जनसंपर्क विभागाकडून निर्बंध शिथिल केल्याचा संदेश येत आहे. यावरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
करोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?” असा सवाल करत “तुमच्या अशा बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय. लॉकडाउनसारख्या निर्णयात एवढा गोंधळ?” असा सवाल प्रवीण दरेकरांनी यावेळी उपस्थित केला आहे.
• करोनाचे निर्णय म्हणजे खो-खो खेळ वाटला की काय सरकारला?
• संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय तुमच्या अशा बालिशपणामुळे लॉकडाऊनचा सारख्या निर्णयात एव्हढा गोंधळ?@CMOMaharashtra #CovidScam
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील
‘हे सरकार आहे की सर्कस?’; अतुल भातखळकरांची अनलॉकवरुन टीका
…त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही; हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर
शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील