Home महाराष्ट्र नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील

पुणे : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिल्याचा विषयही असाच आहे. या महाराष्ट्राने आपण एकमेकांचे शत्रू जरी असलो तरी त्या भागात असलो तर भेटायला जायचं ही संस्कृती आहे. नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात तर भाजपाच्या खासदार आहेत. प्रामुख्याने रक्षाताईंना भेटायला ते गेले होते. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान “भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, अनेकजण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहे. त्यांची इच्छाशक्ती एवढी दांडगी आहे की आजारी असतानाही कामकाज सुरु आहे. आजारी होते म्हणूनच देवेंद्र फडणवीस त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते”, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘हे सरकार आहे की सर्कस?’; अतुल भातखळकरांची अनलॉकवरुन टीका

…त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही; हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर

शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील

“गोपीनाथ मुंडे आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं”