मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘वीकेंड लॉकडाऊन’ म्हणजे शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा तसेच लसीकरणाच्या मोहिमेस मदत करावी, असं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयंकर आहे. त्यामुळे आत्ताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता आमचे सर्व नेते व आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत. तसेच जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल या दृष्टीकोनातून भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होतील, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आम्ही जनतेला आव्हान करतो की, या संपूर्ण निर्णयाला जनतेनं सहकार्य करावं. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो, त्यांनी नियमांचे पालन करावं., असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यात विकेंड लाॅकडाऊन जाहीर; पहा असं असेल लाॅकडाऊनचं स्वरूप”
“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
“IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”