मुंबई : करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी ‘गो करोना… गो… गो करोना…’ अशी घोषणाबाजी करतानाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आठवलेंना अनेकांनी ट्रोल केलं आहे. मात्र ट्रोल करणाऱ्यांना आता आठवलेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
गो करोना… गो… गो करोना… गो’वरुन ट्रोल करण्यात येत आहे, तुमच्यावर टीका होत आहे यासंदर्भा आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला. “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”, असा सवाल आठवलेंनी यावेळी केला.
एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे,” असं मतही आठवलेंनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय
“उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त 1 करोड जाहीर करताना लाज वाटली नाही का?”